पनवेल विभागातील पाण्याच्या समस्या सोडवण्याच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
सिडको परिसरातील खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलोनी, नवीन पनवेल आणि पनवेल विभागातील पाण्याच्या समस्या सोडवण्याच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पाण्याच्या समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधिक अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत सहव्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक शिनगारे, स्थायी समिती सभापती श्री. प्रवीण पाटील, प्रभाग समिती ‘ड’ अध्यक्ष श्री. तेजस कांडपिळे, मुख्य अभियंता श्री. धायटकर, अधिक्षक अभियंता (पाणीपुरवठा विभाग) श्री. काळे, कार्यकारी अभियंता श्री. दलाल नगरसेवक श्री. डॉ. अरुण भगत तसेच नगरसेवक श्री. निलेश बाविसकर उपस्थित होते.