पनवेल येथील बस आगार नुतनीकरणाच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी
राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल येथील बस आगार नुतनीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून फार वेळ झाला असूनही अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही,या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे करण्यात आली आहे, नुतनीकरणाचे काम सुरु न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलनाचा इशारा !!