• English
  • मराठी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य सभागृहसाठी वाढीव निधीकरिता उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट..

 

पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य सभागृह उभारण्यात येणार आहे. यासाठी अंदाजित आठ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या संदर्भात निधी उपलब्ध व्हावा म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी उरणचे आमदार मा.श्री. महेशजी बालदी, पनवेल महानगरपालिकेच्या मा. महिला व बाल कल्याण सभापती सौ. मोनिका महानवर आदी उपस्थित होते.

कळंबोली मधील सेक्टर -११ भूखंड क्रं. ६ या जागेवर उभारण्यात येणाऱ्या सभागृहात तळ आणि २ मजली इमारत प्रस्तावित करण्यात आलेली असून प्रस्तावित इमारतीमध्ये तळ मजल्यावर पार्किंग, पहिल्या मजल्यावरती बहुउद्देशीय हॉल (३७७२ चौ. फुट) असा संकल्पीय आराखडा तयार करण्यात आला आहे. सभागृह, कार्यालय, स्वच्छतागृह इत्यादी व दुसऱ्या मजल्यावर अभ्यासिका व वाचनालय याची तरतूद करण्यात आली असून या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ १७२५.४२ चौ.मी. (१८५६५.५२ चौ. फुट) असे आहे.