खारघर शहरात युलू आणि सिडकोच्या माध्यमातून सार्वजनिक सायकल योजना रविवारी सुरू करण्यात आली.
खारघर शहरात युलू आणि सिडकोच्या माध्यमातून सार्वजनिक सायकल योजना रविवारी सुरू करण्यात आली. संबंधित सायकल योजना ही पब्लिक बायसिकल शेअरिंग सिस्टीम या तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. शहरात याकरिता स्थानके उभारली जाणार आहेत. नवी मुंबई महापालिकेनेही ही सेवा शहरातील नागरिकांसाठी सुरू केली आहे. या सेवेचा विस्तार खारघर शहरापासून नवीन पनवेलपर्यंत करण्यात येणार आहे. सायकल म्हणजे व्यायामासाठी सहज-सोपे साधन! तसेच इंधनांची बचत, कमी प्रदूषण या बाबी लक्षात घेता हा फारच पर्यावरण पूरक उपक्रम आहे. या योजनेमुळे नागरिकांना निरोगी आयुष्याचा लाभ सुद्धा होईल. सिडकोच्या या योजनेचे सर्व स्तरांतून स्वागत होईल, यात शंका नाही.