जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला
आपल्या भारतीय संविधानात महिला व बाल संरक्षणासाठी अनेक कायदे व तरतुदी तसेच योजना आहेत परंतु या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महिला वर्गाला या कायद्यांची माहिती असणे फार गरजेचे आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ व अधिनियम २००६ या कायद्याची तसेच अनेक योजनांची माहिती सर्व भगिनी वर्गापर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व महिला वर्गाने या कायद्यांची आणि योजनांची माहित घेऊन त्याचा योग्य वेळी लाभ घ्यावा हि सदिच्छा!