पनवेल-कळंबोली ते जेएनपीटी महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक झाली.
पनवेल-कळंबोली ते जेएनपीटी महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक झाली. या बैठकीस सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले, भूमिलेख अधिकारी योगेश सावकारे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सदरचा महामार्ग लवकरात लवकर तयार होण्याबाबत चर्चा झाली. पनवेल परिसरातून पनवेल-सायन, द्रुतगती, एनएच ४, एनएच ४बी हे महामार्ग जातात. त्यामुळे येथून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. याशिवाय महामार्गालगत पनवेल शहराबरोबरच नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, नावडे या वसाहती विकसित झाल्या आहेत. लोकसंख्या वाढत असल्याने त्या तुलनेत खासगी वाहनांचे प्रमाण जास्त आहे. पनवेल आणि सिडको वसाहतीतून नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे या महानगरांकडे नोकरी व्यवसायानिमित्त जाणाऱ्या-येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बाहेरून येणारी वाहने अधिक स्थानिकांच्या दुचाकी व चारचाकी महामार्गावरून धावतात. या सर्व गोष्टींचा आढावा याबैठकीत करण्यात आला. त्यामुळे उरण, पनवेल व नवी मुंबई तसेच मुंबई गोवा मार्गावरील वाहनांना मोठे रस्ते उपलब्ध होणार आहेत.