मेट्रो सेंटर विशेष भूसंपादन अधिकारी आणि सिडको अधिकारी तसेच ग्रामस्थांची एकत्रित बैठक
पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील साडेबारा टक्के भूखंडांसंदर्भात तसेच सिडकोमार्फत येत्या काळात विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करण्यात येणार आहे. त्यांची नुकसानभरपाई, पुनर्वसन व पुनर्स्थापना याबाबत मंगळवारी मेट्रो सेंटर विशेष भूसंपादन अधिकारी आणि सिडको अधिकारी तसेच ग्रामस्थांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आदेशाने पार पडलेल्या बैठकीत उपस्थित होतो. या बैठकीत ग्रामस्थांनी सिडको मार्फत सदर भूखंडाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या साडेबावीस टक्के विकसित जमीन मिळण्यामध्ये होणारी दिरंगाईबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या. 2017 सालापासून प्रक्रिया सुरू होऊन अद्यापही ग्रामस्थांना मोबदला मिळालेला नाही अशी भावना व्यक्त केल्या. या संदर्भामध्ये सद्यस्थितीबाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात यावे,अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.