• English
  • मराठी

उत्तुंग यशाबद्दल चिराग गायकवाड व राज पाटील या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन

स्टुडंट्स ऑलम्पिक असोसिएशन, इंडिया यांच्या वतीने उत्तराखंड येथील हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीस्पर्धेत पनवेलच्या चिराग गायकवाड याने सुवर्णपदक तर राज पाटील याने रौप्य पदक पटकावले. चिराग गायकवाड याची कामगिरी पाहता त्याची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या उत्तुंग यशाबद्दल चिराग गायकवाड व राज पाटील या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा!