CAA (नागरिकत्व सुधारणा कायदा) च्या समर्थनार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
CAA (नागरिकत्व सुधारणा कायदा) च्या समर्थनार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नागरीकत्व सुधारणा कायदा (CAA) हा कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेणारा नसून तो देशातील नागरिकांना नागरिकत्व बहाल करणारा कायदा आहे. भारतीय कोणत्याही जातीधर्माच्या नागरिकांचे यामुळे नागरिकत्व धोक्यात येणार नसून तशाप्रकारचा कोणताही गैरसमज कोणत्याही समुदायातील नागरिकांनी करुन घेवू नये. हा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या रॅलीचा उद्देश होता. या रॅलीला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सर्वांचे आभार!