• English
  • मराठी

पनवेल महापालिका देवाळे तलाव येथे भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन

पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य मा.श्री. निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महापालिका देवाळे तलाव येथे भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल मधील दहा वर्षांखालील लहानग्यांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांनीच या जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सहभागी होऊन वाढदिवसानिमित्त निलेशजींना शुभेच्छा दिल्या.