• English
  • मराठी

स्थानिक आमदार निधीच्या माध्यामतून तालुक्यात विविध विकासाकामांचा शुभारंभ करण्यात आला.

स्थानिक आमदार निधीच्या माध्यामतून तालुक्यात विविध विकासाकामांचा शुभारंभ करण्यात आला. या कामांचे भुमीपूजन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. पनवेल तालुक्यातील वाजे गावात राजेश भोईर ते नामदेव पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, उमरोली गावाच्या मुख्य रस्ता पासून ते हनुमान मंदिर पर्यंतच्या रस्त्यांचे डांबरीकरण, भाणघर गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, मोर्बे गावात पेव्हर ब्लॉक बसविणे, केवाळे गावातील मुख्य रस्ता ते केवाळे शाळे पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण अणि केवाळे गावातील हरि दत्तू गायकर ते बळीराम गायकर यांच्या घरा पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम स्थानिक आमदार विकास निधीच्या मध्यामून करण्यात येत आहेत. या वेळी सरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.