• English
  • मराठी

महाराष्ट्र कुंग-फू राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

कुंग-फू स्पोर्ट्स असोसिएशन, नवी मुंबई च्या वतीने आणि महाराष्ट्र कुंग-फू स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात सातव्या महाराष्ट्र कुंग-फू राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, ठाणे, रायगड, नांदेड, सांगली, नाशिक सह इतर जिल्ह्यांतील सुमारे 200 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा 6, 9, 11, 14, 17, 19, 25 वर्षांखालील आणि 25 वर्षांवरील खुल्या गटात खेळविण्यात आली. यानिमित्ताने सदर स्पर्धेला भेट देऊन सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहित केले. यावेळी माझ्यासह पनवेल मधील भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक तसेच ऑल इंडिया कुंग-फू फेडरेशनचे अनेक मान्यवर उपस्थित होते.