• English
  • मराठी

’अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या ’अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा उद्घाटन सोहळा आज पार पडला.
मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रसृष्टी मधील अनेक दिग्गज मान्यवराची विशेष उपस्थिती आज महाअंतिम फेरीच्या प्रथम दिवशी लाभली.