खारघर परिसरातील 50 महिलांना तीनचाकी व चार चाकी चालवण्याचे प्रशिक्षण
7 महिलांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देत त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या मा. सभापती सौ हर्षदा उपाध्याय यांच्या पुढाकाराने खारघर परिसरातील 50 महिलांना तीनचाकी व चार चाकी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याच प्रशिक्षण उपक्रमाचे खारघर भाजपाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले.