महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही
महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही, वचन दिल्याप्रमाणे अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत दिली नाही आणि फसवी कर्जमाफी जाहीर करून दिशाभूल केली. तसेच या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढच झाली आहे. केवळ भाजप सरकारचे जनहिताचे निर्णय केवळ स्थगित करण्याचा एक कलमी उपक्रम राबवित आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ याबाबद्दल राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो!