किसान संवाद सभा
![[:en]Kisan Samvad Sabha[:hi]किसान संवाद सभा[:] 1](https://www.prashantthakur.in/wp-content/uploads/2020/10/WhatsApp-Image-2020-10-19-at-18.36.00-1-690x460.jpeg)
किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माजी कृषिमंत्री डॉ. अनिलजी बोंडे यांच्या सोबत पनवेल तालुक्यातील गिरवले गावी जाऊन शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धान शेतीची पाहणी केली, राज्य सरकारने पंचनामे न करता शेतकऱ्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारला करण्यात आली. याप्रसंगी आमदार महेश बालदी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व पंचायत, समिती सदस्य, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.