लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे,हा निर्धार पक्का आहे!
दि. बा. पाटील साहेबांच्या स्मृतिदिनी एकवटलेला हा जनसमुदाय पाहून नामकरणाबाबत राज्य सरकारला निश्चितचं विचार करावा लागेल!
शांततेच्या मार्गाने व स्वयंस्फूर्तीने ह्या आंदोलनात ठाणे ,रायगड मुंबई ,पालघर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी शतश: आभारी आहे. दि. बा. पाटील साहेबांवर श्रद्धा असलेल्या अशीच एकजूट राहू द्या!, आपला निर्धार पूर्ण केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही!