• English
  • मराठी

सेवा पंधरवडा अंतर्गत रक्तदान शिबीराचे आयोजन

देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रजी मोदी साहेब व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा, पनवेल ग्रामीण व शहर मंडल यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबीराला उपस्थित राहून रक्तदात्यांना शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले. तसंच आयोजनामध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.