खारघर येथे स्त्री रोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन; शिबिरातून अनेक महिलांची मोफत PAP SMEAR चाचणी !
भारतीय महिलांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या कारणांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग हे दुसरे सर्वात प्रमुख कारण आहे. याच कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या मा. सभापती सौ. हर्षदा उपाध्याय आणि दिव्य ज्योत चॅरीटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथे स्त्री रोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरास भेट देऊन उपस्थित डॉक्टरांशी आणि महिला-भगिनींशी संवाद साधला व या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरातून अनेक महिलांची मोफत PAP SMEAR चाचणी करण्यात आली.