• English
  • मराठी

खारघर मध्ये 15 किमी. सायकलिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही “खारघर मॅरेथॉन” आयोजित केली आहे. याच पार्श्वभूमीवर खारघर मॅरेथॉन प्री इव्हेंट म्हणून 15 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खारघर येथे पार पडलेल्या या स्पर्धेला सायकलप्रेमी खारघरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेतील स्पर्धकांचा उत्साह पाहून खारघरसह संपूर्ण पनवेल आणि नवी मुंबई शहर उद्याच्या खारघर मॅरेथॉन साठी सज्ज असल्याचे दिसून आले.