• English
  • मराठी

“गव्हाण प्रीमियर लीग”ला क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

आई एकविरा स्टार्स व भावार्थ नाखवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण येथील पाटणे मैदानात “गव्हाण प्रीमियर लीग” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिभावान क्रिकेटपटूंच्या दर्जेदार खेळामुळे आणि क्रिकेट प्रेमींच्या उत्तम प्रतिसादामुळे ही लीग चांगलीच रंगली. खेळाचा आनंद घेण्यासाठी मी देखील या स्पर्धेला भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले.