रायगड जिल्हा नियोजन व विकास समिती बैठक संपन्न
राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात संपन्न झाली.
यावेळी माझ्यासह खासदार मा. श्री. श्रीरंगजी बारणे, खासदार मा. श्री. सुनीलजी तटकरे, आमदार मा. श्री.भरतजी गोगावले, आमदार मा. श्री. महेंद्रजी थोरवे, आमदार मा. श्री. महेशजी बालदी, आमदार मा. श्री. महेंद्रजी दळवी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, पनवेल मनपा आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्यासह विविध शासकीय विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.