• English
  • मराठी

सेवा पंधरवडा” अंतर्गत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

 

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या कालावधी दरम्यान “सेवा पंधरवडा” या विशेष उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी कडून विविध स्तरावर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पनवेल व खांदा कॉलोनी महिला मोर्चा यांच्या पुढाकाराने खांदेश्र्वर शिवमंदिर हायवे साईट खांदा कॉलनी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गाचे व सजीवांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी, जागतिक तापमान वाढीच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी वृक्षांची लागवड आणि संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीचे महत्त्व जाणून भाजपा महिला मोर्चा, पनवेल व खांदा कॉलोनीच्या वतीने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी होऊन स्वतः वृक्षारोपण केले. याप्रसंगी माझ्यासह पनवेल शहर प्रमुख श्री. जयंत पगडे व भाजपा महिला मोर्चा, पनवेलच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व मा.नगरसेविका आणि कार्यकर्ते उपस्थित होते.