पनवेल तालुक्यातील लोणिवली येथील अंगणवाडीचे उद्घाटन केले
पनवेल तालुक्यातील लोणिवली येथील पूर्वीची अंगणवाडी जीर्ण झाल्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी नव्या अंगणवाडी च्या उभारणीसाठी जिल्हा वार्षिक योजना निधीतून 8 लाख 50 हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून उभारण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन केले. या नव्या अंगणवाडीत वर्ग, किचन, स्टोर रूम, शौचालय अशा सर्व सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत.