• English
  • मराठी

नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक मेडिकल साहित्यांचा उद्घाटन सोहळा संपन्न

 

डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने १ सोनोग्राफी मशीन, ५ बेबी वॉर्मल, २ रेडीयंट हिटर, १ पिडीयाट्रीक वेंटीलेटर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजने पिडीयाट्रीक सर्जरीसाठी लागणारी उपकरणे आणि महाराष्ट्र शासनाच्या इसीआरपी अंतर्गत 32 पिडीयाट्रीक आयसीयु बेड, आणि 40 अडल्ट आयसीयु बेड आणि 10 केएल क्षमतेचा लिक्विड मेडीकल ऑक्सीजन टँक देण्यात आले आहे. या निमित्त उपजिल्हा रुग्णालयात आयोजित विशेष सोहळ्यात अनेक मान्यवरांसह या मेडिकल साहित्याचे उद्घाटन केले. सध्या उपजिल्हा रुग्णालयात केवळ एकच डायलेसीस टेक्निशियन उपलब्ध आहे अशावेळी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जो पर्यंत डायलेसीस साठी अधिकृत टेक्नीशीयन उपलब्ध होत नाही तो पर्यंत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून टेक्नीशियन देऊ, असे यावेळी जाहीर केले.