• English
  • मराठी

देवेंद्रजींनी आद्य क्रांतिवीर वासुदेव फडके यांच्या जन्मगावी शिरढोण येथे भेट देऊन वासुदेव बळवंत फडकेंच्या वाड्याचे लोकार्पण केले

भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस पनवेल मध्ये आले होते. यावेळी देवेंद्रजींनी आद्य क्रांतिवीर वासुदेव फडके यांच्या जन्मगावी शिरढोण येथे भेट देऊन वासुदेव बळवंत फडकेंच्या वाड्याचे लोकार्पण केले. यावेळी देवेंद्रजींनी फडकेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर उरणचे आमदार मा.श्री. महेशजी बालदी यांच्या माध्यमातून वनवासी बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटनही देवेंद्रजींनी यावेळी केले.