नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासाठी लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील साहेबांचे नाव
भूमिपुत्रांच्या मागणीला मान देत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासाठी लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील साहेबांचे नाव दिल्याबद्दल केल्याबद्दल लोकनेते दि. बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. लोकनेते दि. बा. पाटील साहेब आयुष्यभर प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांसाठी लढले. त्यांच्या नेतृत्वाने अनेकांच्या जीवनाला नवी दिशा दिली. दिबांच्या कार्याचा गौरव करत राज्य सरकारने जो निर्णय घेतला त्याबद्दल राज्य सरकारचे विशेष आभार! भूमिपुत्रांनी आंदोलनाला साथ दिली आणि दिबांच्या नावाच्या मागणीसाठी रेटा लावला. त्याबद्दल सर्व भूमिपुत्रांचेही विशेष अभिनंदन. लवकरात लवकर या ठरावाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.