पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची गुरुपौर्णिमेनिमित्त रेवदंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले
ज्यांच्या थोर विचारांनि, शिकवणीने, संस्कारांनी आणि अलौकिक समाजकार्याने महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील अनेकांना जीवन समृद्धीचा मार्ग दाखवला असे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, व थोर निरुपणकार तीर्थरूप पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची गुरुपौर्णिमेनिमित्त उरणचे आमदार श्री. महेश बालदी यांच्यासह रेवदंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी रायगड भूषण डॉ.सचिनदादा धर्माधिकारी, श्री. उमेशदादा धर्माधिकारी, तसेच उरण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री.नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.