• English
  • मराठी

उज्ज्वल भविष्याचा घेऊनी ध्यास, शहरांसोबत होतोय गावांचा विकास !!

“सबका साथ सबका विकास” हे ब्रीद सार्थ ठरवीत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शहरांसोबतच गावांचाही विकास होत आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील चिंध्रण येथे रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी स्थानिक आमदार विकास निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला होता. या रस्त्याचे भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष श्री. अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.