केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार मा. श्री प्रकाशजी जावडेकर – पनवेल विधानसभा मतदारसंघास भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला
भारतीय जनता पार्टीला अधिक सशक्त बनविण्यासाठी बूथ सशक्तीकरण अभियानाअंतर्गत माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार मा. श्री प्रकाशजी जावडेकर मावळ लोकसभा दौऱ्यावर असताना आज त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघास भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली या बूथ सशक्तीकरण अभियाना अंतर्गत देशभरातील जनतेचा भाजप वरील विश्वास अधिक बळकट करण्याचा पक्षाचा मानस आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान प्रकाशजींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील महाआघाडी सरकारविरोधातील असंतोषाचा दाखला देत राज्य सरकारवर निशाणा साधला. हे आघाडी सरकार नसून बिघाडी सरकार आहे व महाराष्ट्राच्या जनतेची लूट करत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा सुशासन देण्यासाठी भाजपने कंबर कसली असल्याचे त्यांनी म्हटले. या पत्रकार परिषदेदरम्यान भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस श्री.अविनाशजी कोळी सहभागी झाले होते.