पत्रकार परिषद – दिबां’च्या स्मृतिदिनी सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने ‘दिबां’च्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जून रोजी सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. दिबां’च्या स्मृतिदिनी होणार्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत आंदोलनाचा इशारा कृती समितीने दिला. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत.