• English
  • मराठी

कोविड काळात उल्लेखनीय समाजकार्य केलेल्या स्वास्थ्य कर्मचाऱ्यांचा तसेच स्वच्छता दुतांचा गुणगौरव सोहळा

बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधित पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे कोविड काळात उल्लेखनीय समाजकार्य केलेल्या स्वास्थ्य कर्मचाऱ्यांचा तसेच स्वच्छता दुतांचा गुणगौरव सोहळा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित विविध कलात्मक स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा यांचा बक्षिस समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास उपस्थित राहून स्वास्थ्य कर्मचारी तसेच स्वच्छता दूत यांनी पनवेल मधील जनतेसाठी केलेल्या महत्वपूर्ण कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले तसेच स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक करीत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.