• English
  • मराठी

कामोठे येथील काम बंद आंदोलनात दिला इशार

31 मेपर्यंत व्यवस्थित पाणी न मिळाल्यास सिडको अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीत बसू देणार नाही!!

कामोठे मधील पाणी समस्येबाबत सिडको कान आणि तोंड बंद करून बसलेल्या सिडकोला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, कामोठे मंडल तर्फे गुरुवारी सकाळी मानसरोवर रेल्वे स्टेशनजवळील सुरू असलेले सिडकोचे काम बंद करण्यासाठी काम बंद आंदोलन करण्यात आले.

सिडकोने गृहसंकुल उभारताना डेव्हलपमेंट चार्जेस घेतले आहेत आणि त्या अनुषंगाने पाणी, गटारे, रस्ते व तत्सम सुविधा देण्याचे कर्तव्य सिडकोचे आहे. पण सिडको स्वतःची जबाबदारी झटकत आहे. 31 मेपर्यंत व्यवस्थित पाणी न मिळाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही सिडकोच्या कार्यालयात शिरून त्याचा ताबा घेऊ आणि आम्हाला पाणी मिळेपर्यंत अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीत बसू देणार नाही, असा इशारा यावेळी दिला.