• English
  • मराठी

विकासकामांचे भूमिपूजन श्री. अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.

खानाव ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि जलजीवन मिशन अंतर्गत विहिर बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी पार पडला. सुमारे 82 लाखांच्या या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष श्री. अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. आमदार निधीतून 7 लाख 89 हजार रुपये खर्चून खानाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लक्ष्मण कोंडू पाटील यांच्या घरापासून ते तवले यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तसेच जलमिशन अंतर्गत व नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून 74 लाख 10 हजार 544 रुपयांचा निधी वापरुन विहिर बांधण्यात येणार आहे.