• English
  • मराठी

“आमदार चषक 2022” या राज्यस्तरीय कबड्डी- मिडलाईन स्पोर्ट्स (कर्जत) क्लबने चषकावर आपले नाव कोरले.

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळ आयोजित “आमदार चषक 2022” या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम रोमहर्षक लढतीत रायगड जिल्ह्याच्या मिडलाईन स्पोर्ट्स (कर्जत) क्लबने सरस कामगिरी करीत आमदार चषकावर आपले नाव कोरले. तर रत्नागिरी चिपळूणच्या दसपट्टी संघाला स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मिडलाईन क्लबचा सुयोग गायकर व दसपट्टी मंडळाचा अभिषेक भोजने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. सहभागी खेळाडूंची बहारदार कामगिरी तसेच अत्यंत उत्तम व शिस्तबद्ध आयोजनामुळे क्रीडा रसिकांना कबड्डीचा थरार अनुभवता आला.