• English
  • मराठी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 342 व्या पुण्यतिथी निमित्त आज किल्ले रायगड येथे आयोजित शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींस अभिवादन केले.

 

या कार्यक्रमाला केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री मा. श्री. ज्योतिरादित्यजी सिंधिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिव पुण्यस्मृती पुरस्कार या मुख्य पुरस्काराने भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना गौरविण्यात आले. तसेच अति विशिष्ट सेवा मेडल व परम विशिष्ट सेवा मेडल प्राप्त व्हाईस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार आणि नरवीर तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांचे वंशज मालुसरे घराणे यांचादेखील विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमुदुमुन गेला होता.