• English
  • मराठी

आगरी कोळी महोत्सव-2022

भारतीय जनता पक्ष खारघर व शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने व पनवेल महापालिकेचे नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांच्या पुढाकाराने 6 ते 20 मार्चदरम्यान आगरी कोळी महोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान मिसेस खारघर स्पर्धा 19 व 20 मार्च रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम विजेती अनामिका खिप्पल, द्वितीय रीना कोटीयन व तृतीय क्रमांक काजल कांबळे यांनी पटकावला. या स्पर्धेतील विजेत्यांना मानाचा मुकुट, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला.