गीतांजली हा देशभक्तीपर गीतांचा सुरमयी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त संस्कार भारती, उत्तर रायगड जिल्हा, पनवेल समिती आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी गीतांजली हा देशभक्तीपर गीतांचा सुरमयी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक, अभ्यासक, लेखक चंद्रकांत शहासने उपस्थित होते. या कार्यक्रमाकरिता कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही. या सूरमयी कार्यक्रमातून भारतीय स्वातंत्र्य सैनिक तसेच स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना स्वरांजली अर्पण करण्यात आली. हुतात्म्यांचे कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असून अशा उत्कृष्ट कार्यक्रमांमधून ते समर्थपणे पोहोचविले जात असल्याचा आनंद आहे.