खारघर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
प्रवीण स्पोर्ट्स वेल्फेअर असोसियशनच्या वतीने काळूराम महादू पाटील यांच्या स्मरणार्थ माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक श्री. प्रवीण पाटील आणि नगरसेवक श्री. रामजी बेरा यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस माझ्यासह आमदार मा. श्री. महेशजी बालदी, सभागृह नेते श्री. परेशजी ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष श्री. अरुणजी भगत, सन्मा. महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सौ. सीताताई पाटील आदी मान्यवरांनी भेट देवून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या