• English
  • मराठी

छत्रपती शिवाजी महाराज

उलवा नोडमधील खारकोपर रेल्वे स्टेशन जवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून जेथे शिवसृष्टी व शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे त्याप्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रतिमेचे पूजन आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर माजी खासदार तथा समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, सरचिटणीस, कामगार नेते महेंद्र घरत, उद्योजक जे. एम. म्हात्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.