• English
  • मराठी

छत्रपती शिवाजी महाराज

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पनवेल शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले . यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीता पाटील, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, अतुल पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, राजू सोनी, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, नगरसेविका दर्शना भोईर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहराध्यक्ष रोहित जगताप, पवन सोनी यांच्यासह उपस्थित नागरिकांनी अभिवादन केले.