• English
  • मराठी

विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन

भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांनी दिलेला संघर्षाचा मूलमंत्र घेत लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या साक्षीने ओवळे फाटा येथे विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.
प्रकल्पग्रस्तांचे हक्क संघर्षाशिवाय मिळत नाही आणि मिळाले नाहीत. सिडकोकडे एमडी, जॉईंट एमडी, आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत ते फक्त बैठका घेतात पण निर्णय घेत नाहीत. सिडकोला वाटतंय कोविड बचावासाठी येईल, सिडको प्रकल्पग्रस्तांना गांभीर्याने घेत नाही सिडकोकडे निर्णय क्षमता राहिली नाही त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही. दिबा’साहेबांचे नाव विमानतळाला लागले पाहिजे यासाठी सर्व आंदोलनांत भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचा मोठा वाटा आहे. काम बंद पाडणे आपले उद्दिष्ट नाही, तर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. सिडको आणि राज्य सरकार भूमिपुत्रांच्या बाबतीत गंभीर नाही हे प्रकर्षाने जाणवत आहे. आज एक दिवस लाक्षणिक आंदोलन केले, पण यापुढे बेमुदत काम आंदोलन केले जाईल हे सिडकोने लक्षात घ्यावे.