• English
  • मराठी

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा!

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत व खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आठव्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेची रायगड केंद्रासाठीची
प्राथमिक फेरी रविवारी पार पडली. प्राथमिक फेरीसाठी महाराष्ट्रभरातून १०८ संस्थांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेत रायगड केंद्रासाठीची प्राथमिक फेरी रविवारी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात रंगली. रायगड केंद्रातंर्गत प्राथमिक फेरीत १२ एकांकिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये फ्रायडे फिल्मस् आणि निषाद एन्टरटेन्मेंट प्रस्तुत गुज, कोकण ज्ञानपीठ वाणिज्य व कला महाविद्यालयाची त्रिशंकु आणि सीकेटी स्वायत्त महाविद्यालयाची १०५ अ ब क या एकांकिकांनी प्रथम तीन क्रमांक पटकाविले.
या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा!