• English
  • मराठी

संगणक कक्षाचे उद्घाटन

पनवेल तालुक्यातील रिटघर मधील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यकिम विद्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लीक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी यांच्या सहकार्याने संगणक कक्ष सुरु झाला आहे. नव्याने सुरु झालेल्या या संगणक कक्षाचे उद्घाटन काल संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे औचित्यसाधून थायलँड येथे बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलेल्या साहिल सिनारे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व मुलांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाच्या दिशेने जो पाऊल टाकत जाईल त्याचा उत्कर्ष ठरलेला आहे.