फुल नहीं चिंगारी हैं, ये भारत की नारी हैं..
भारतीय जनता पार्टी, खारघर मंडल व सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे, त्या स्वावलंबी बनाव्या यासाठी रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर कॉलेज मधील सुमारे शंभर मुलींना स्वयंसिद्धा चे धडे देण्यात आले.
राज्यात शालेय मुली, तरुणी व महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. पिडातांमध्ये शालेय आणि महाविदयालयीन विदयार्थीनींचाही समावेश आहे. मैत्रीच्या आडून प्रेमाच्या जाळ्यात ओढून निर्माण केलेल्या विश्वासातून देखील अनेकदा लैंगिक अत्याचार केले जातात.. छेडछाड विनयभंग तसेच अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्याच्या अनुषंगाने वेगळे वेगळे कठोर कायदे केले जात आहेत. परंतु स्वतःचे संरक्षण स्वतः केल्यास अशा प्रकारच्या घटनांना नक्कीच आळा बसू शकेल.