सोपान संस्थेच्या शनय ऑटिझम रिसोर्स सेंटरचे उद्घाटन कांदिवली विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
सोपान संस्थेच्या माध्यमातून समाजाला प्रेरणा देण्याचे काम होत असून देवाचे आशिर्वाद या संस्थेच्या पाठीशी आहे त्यामुळे वेळोवेळी या संस्थेला हितचिंतकांचा पाठिंबा मिळाला आहे. या केंद्रातून स्वमग्न मुलांच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे, त्यामुळे हे केंद्र पाल्य आणि पालक यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरणार आहे.