• English
  • मराठी

भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे वडाळे तलावाजवळ दिवाळी पहाट

मनाला चैतन्यमयी करणारे स्वर, सतारीच्या मंजूळ तारांनी हृदयाच्या छेडल्या गेलेल्या तारा…
अशा प्रफुल्लित वातावरणात गायन आणि वादनाच्या सुरेल अविष्कारानी रंगलेल्या मैफिलीने रसिकांचा पाडवा ‘गोड ‘ करण्यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे वडाळे तलावाजवळ दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या स्वरमयी अविष्काराला रसिकांच्या उदंड प्रतिसादात प्रारंभ झाला. प्रसिद्ध युवा गायक राहुल देशपांडे यांच्या गानमैफिलीने स्वर चैतन्याची नांदी झाली. त्यांच्या स्वरांनी आसमंतात मांगल्याचे रंग भरले.