• English
  • मराठी

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ठोस आश्वासन देण्याऐवजी चालढकलपणा आणि कर्मचाऱ्यांवरती दबाव आणण्याचे काम हे राज्य सरकार करत आहे.
परंतु त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभे आहे.
त्यामुळे मी एक लोकप्रतिनिधी या नात्याने येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमच्या कर्मचारी बांधवांसाठी आवाज नक्कीच उठवणार आहे .
त्याचबरोबर ज्या ज्या व्यासपीठांच्या माध्यमातून राज्य शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करता येईल . त्या माध्यमातून यापुढच्या कालावधीमध्ये मी व आमचे सर्व पदाधिकारी, सहकारी नक्कीच आवाज उठवू।
राजकारण बाजूला ठेवून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची मागणी आहे.