दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले
दीपावली सणानिमित्त भारतीय जनता पक्षाचे वतीने दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन कळंबोली येथे करण्यात आले. दिवाळीनिमित्त कामोठे, कळंबोली, खारघर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जनसंपर्क कार्यालय येथे, तर नवीन पनवेल येथे नगरसेवक संतोष शेट्टी यांचे जनसंपर्क कार्यालय अशा एकूण चार ठिकाणी दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये रवा, मैदा, चणाडाळ, साखर, पोहे, गूळ, डालडा, गोडेतेल आदी वस्तूंचा समावेश आहे.