• English
  • मराठी

सिडकोने बेलापूर-पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार दिला जाईल, असे आश्वासन दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे भाजपच्या वतीने तळोजा येथील मेट्रो कारशेड येथे काम बंद आंदोलन करण्यात आले.

नवी मुंबई मेट्रोमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यासाठी मी आमदार म्हणून 2015पासून पाठपुरावा करीत आहे, पण चालढकलपणा करीत या ठिकाणी नागपूर येथून भरती करण्यात आली. स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा येथे 100 टक्के विचार करणे आवश्यक आहे. आगामी भरतीमध्ये किमान 80 टक्के रोजगार देण्याच्या अनुषंगाने आम्हाला लेखी आश्वासन मिळावे अशा प्रकारची मागणी होती. त्यासाठी आम्ही कारशेडमध्ये प्रवेश करीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. जर आमची मागणी मान्य केली गेली नाही तर यापुढे मेट्रोची ट्रायल करून दिली जाणार नाही. त्याचबरोबर हा प्रकल्प चालू दिला जाणार नाही .